Wednesday, November 28, 2007

नातं

मला तुझ्याशी काही बोलायचंय
आकाशाचं नातं सांगायचंय ,
मानापमानाच्या झुल्यावर झुलतानाही
तुझ्या अंतःकरणात डोकवायचंय.

वाट तुझी जिद्दीची आहे
पण पुढे उखडलेली आहे.
हे तुला नसलं तरी , मला माहित आहे,
म्हणून मी अस्वस्थ आहे.

तुझ्या माझ्या मधील विश्वासाचा पूल
तुला नको आहे,
त्यामुळे माझे प्रेम हे एक
कोमेजलेले फ़ूल आहे.

हे फ़ूल फ़ुलवण्यासाठी
विश्वासाचा पूल बांधण्यासाठी ,
शब्दांच्या पाकळ्या या जुळवलेल्या आहेत
तरी यांचा तू अव्हेर करू नकोस.

मला तुझ्याशी काही बोलायचंय.......


'संध्या ' दिवाळी अंक १९९८ मध्ये प्रसिध्द.

0 comments:

Thank You for Visiting the Website .

About Me

काव्यतरंग !

काव्यतरंग !
सी. आर. गायकवाड, पुणे-१२