तारुण्याच्या उंबरठ्यावर वाड्याला त्यांनी सोडले,
पोटसाठी भटकले , वार्धक्याच्यावेळी परतले.
एकेकाळचा राजावाडा , आज भकास झालाय,
वाड्यातली माणसं भुतासारखी राह्तायत.
स्वत:चीच डागडुजी या माणसांना जमत नाही.
वाड्याची काय करणार ?
बाहेर गेलेल्या नव्या पीढीकडेच आशेनं पाहतायत,
भकासवाडा आणि त्यातली म्हातारी भुतंही
पण नवीन पाखरे त्यांच्याच नादात आहेत.
जीर्णोध्दाराची वाट पाहणे हेच वाड्याच्या नशीबी आहे.
"चैत्रपालवी " काव्यसंग्रहामधे प्रसिध्द
Monday, December 10, 2007
वाडा
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment