Tuesday, November 4, 2008

बॉसची गाडी





बॉसची गाडी

शॉप समोर उभी.

रात्रीही घरी जायला तयार नाही.

१२ वाजताच मशीन सुरु झाल्या.

दोघं तिघं दबकत - दबकत आले,

गाडी भोवती चक्कर मारुन गेले.

गाडी पंक्चर तर नाही?

तर्कावर तर्क करत राहीले.

केबिनकडे तिरकी नजर टाकून गेले.

झोप येऊ नये म्हणून सुट्टीत कैन्टीनला गर्दी झाली.

एक मिनिटही न झोपता थर्ड शिफ़्ट संपली.

... .... ...

... .. .

...

सूर्याच्या प्रकाशात गाडी डोळे मिचकावत उभी होती.

बॉस घरी निवांत झोपला होता.

बंद पडलेली गाडी शॉपवर बॉसिंग करत होती.







0 comments:

Thank You for Visiting the Website .

About Me

काव्यतरंग !

काव्यतरंग !
सी. आर. गायकवाड, पुणे-१२