हरवलेले क्षण शोधता शोधता ,
स्मृतीत हरवलेली अनेक माणसे भेटली.
हरवलेल्या माणसाशी बोलता बोलता,
मी मात्र हरवून गेलो.
लक्षात आलं तेव्हा
स्वत:ला शोधत राहीलो,
शोधतच राहीलो.
. . . . .
. . . .
पेपरावाल्याला गाठला,
"याला आपण पाहिलत का?"
या सदरात माझा माझा फ़ोटो दिला.
पण माझ्याकडे कुणी आलंच नाही.
शोधता शोधता
एक साधुमहाराज भेटले,
त्याना म्हंटलं,
"महाराज, मी हरवलोय , काय करु?"
तो खदा खदा हसला ,
म्हणाला ,
"तुझ्यातलं "मी " पण संभाळ्लयस
म्हणून तू हरवलायस.
मी पण टाकून दे.
आपुलकीची टाकलेली चादर
परत अंगावर घे,
त्या चादरीचा एक जरी धागा
दुसर्याला दिलास तरी
आपुलकीची माणसं
आपोआप तुलाच शोधत येतील
अणि तुझं हरवलं पण
क्षणात नाहीस होईल.
"नाशिक दरबार" या भोसरी, पुणे येथील- २५ सप्टेम्बर १९९८ अंकामधे प्रसिध्द झालेली माझी कवीता.
Friday, August 3, 2007
हरवले पण !
Thank You for Visiting the Website .
Blog Archive
About Me
काव्यतरंग !
सी. आर. गायकवाड, पुणे-१२
