Sunday, August 27, 2023

!! महत्व एकत्र कुटुंबाचे !!

 

“Manifestation” च्या नावाखाली 

निसर्गाचे नियम डावलत, 

मायेच्या बाजारात, 

जेव्हा “आपली माणसं” भरकटतात, 

आणि 

आकाशात भरारी मारताना 

ज्यांनी मोठं केलं, 

त्यांनाच विसरून जातात. 

आणि मग 

कुटुंबसंस्थाच विस्कळीत होऊन जाते. 


तेव्हा थोडं स्थितप्रज्ञ राहून, 

थोडी कृतज्ञतेची जाणीव ठेवून, 

योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर

"स्काय इज लिमिट" म्हणणाऱ्यांचे पाय 

जमिनीवर राहू शकतात.


नियतीचे संकेत चुकीचे नसतात.  

फक्त ते संदेश जाणून घ्यायची पात्रता हवी.  

आणि त्याप्रमाणे स्वतःला बदलायची सुद्धा. 

तरच आपल्या जीवनात 

चंद्राची शीतलता आणि आनंदाची वर्षा 

आणि खऱ्या अर्थानं रामराज्याची संतुष्टता अनुभवाला येऊ शकते. 


ऋचा, वेद, भगवतगीता नुसती कवितेसारखी वाचून समजत नाही, 

ती आचरणात आणावी लागते. 

त्यासाठी हवी श्रद्धा 

तीही मनापासून. 

तर आणि तरच 

जीवनऊर्जेच्या संकेताचा खरा अन्वयार्थ समजू शकतो.  

आणि जीवन अधिक सुलभ, समृद्ध आणि संतुष्ट होऊ शकते. 


कुटुंब एकत्र टिकवणे ही ज्येष्ठांचे कर्तव्य असते, कौशल्य असते.  

ज्याला जमले त्यांचे कुटुंब खरोखर भाग्यवान.  

पण त्यात कित्येकांची कसरत आणि त्याग असतो

हेही तितकेच खरे.

कंपन्या, संघटना एकत्र येतातच,  

पण 

एकत्र कुटुंबातील आपुलकीचा स्पर्श आणि प्रेमाचा ओलावा काही अपूर्वच असतो.

तो टिकवणे ज्यांना जमले ते भाग्यवान !


Thank You for Visiting the Website .

काव्यतरंग !

काव्यतरंग !
सी. आर. गायकवाड, पुणे-१२