कलियुगातला ध्रुतराष्ट्राचा धूर्तपणा
जेव्हा विधानसभेत येऊन बसला,
तेव्हा विरोधीपक्षही गान्धारीसारखा,
डोळ्यावर पट्टी बान्धुन बसला.
कित्येक शकूनीमामा येऊन गेले,
जमेल तेवढी खळगी भरुन गेले.
जनतेशी द्युत खेळत असताना,
ध्रुवपदा ऐवजी असलेले पद घालवुन बसले.
"द्रौपदी-वस्रहरण " करण्याच्या प्रयत्नात ,
स्वत:च्याच घोटाळ्याची प्रकरणे बाहेर पडली.
आम्ही पाण्डव वाट पहातोय श्रीकृष्णाची,
भ्रष्टाचारा विरूध्द 'महाभारत' घडवण्याची.
"जोती -आवाज " जाने.१९९९ मध्ये प्रसिध्द झालेली माझी कवीता
Tuesday, November 27, 2007
'महाभारत'
Thank You for Visiting the Website .
Blog Archive
About Me
काव्यतरंग !
सी. आर. गायकवाड, पुणे-१२
